नवी दिल्ली – मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशवासीयांना एअर टॅक्सीच्या रूपाने एक नवीन भेट मिळाली आहे. हरियाणाच्या चंडीगड ते हिसार पर्यंत देशातील पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. ( India’s first air taxi launched )
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ही एअर टॅक्सी सेवा सुरू केली. हवाई टॅक्सी सुरू झाल्याने आता हिसार ते चंदीगड हा प्रवास अवघ्या 50 मिनिटांत पूर्ण होईल. खास गोष्ट म्हणजे या एअर टॅक्सीचे भाडे रस्त्यावर धावत असलेल्या टॅक्सीसारखेच असेल. हरियाणा ते चंदीगड या चार सीटर एअर टॅक्सी विमानाचे भाडे प्रति व्यक्ती फक्त 1,755 रुपये आहे.
आज #मकर_संक्रांति के शुभ अवसर पर केंद्र सरकार की UDAN योजना के तहत चंडीगढ़ से हिसार के लिए एयर टैक्सी सेवा का शुभारम्भ किया।
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने कहा था कि चप्पल पहनने वाला व्यक्ति भी हवाई सफ़र कर सके, यह पहल उस दिशा में एक ओर कदम है। pic.twitter.com/lIbQcKd4KL
— Manohar Lal (@mlkhattar) January 14, 2021
आज देशात हवाई टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. आणि सध्या याची सुरुवात हिसार ते चंदीगडपर्यंत झाली आहे. येत्या काळात ही सेवा देशातील विविध 26 मार्गांवर सुरू केली जाईल. सध्या नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर टॅक्सी कंपनीला प्रादेशिक संपर्क योजनेंतर्गत 11 मार्गांवर धावण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आले आहे. आता हिसार विमानतळाचा भारत सरकारच्या प्रादेशिक संपर्क योजनेत समावेश करण्यात आला आहे.
एअर टॅक्सीचा दुसरा टप्पा 18 जानेवारीपासून सुरू होईल. या दिवशी एअर टॅक्सी हिसारपासून देहरादूनला उड्डाण करेल. तिसर्या टप्प्यात चंदीगड ते देहरादून व हिसार ते धर्मशाला दरम्यान हवाई टॅक्सी सेवा सुरू केली जाईल. यानंतर हरियाणा ते शिमला, कुल्लू यासह अनेक मार्गांसाठी हवाई टॅक्सी सेवा सुरू केली जाईल. हिसार ते धर्मशाळा हे अंतर अवघ्या दीड तासात पूर्ण होईल आणि त्याचे भाडे 2500 रुपये असेल. डेहराडूनच्या दीड तासाच्या प्रवासासाठी प्रवाशांना 2500 रुपये भाडे द्यावे लागेल.
साधारण विमान प्रवासासाठी हिसार ते चंदीगडला उड्डाण घेतल्यास 2000 ते 2500 रुपयांचे भाडे द्यावे लागेल. याशिवाय दीड तास लागणारी तपासणी वेगळी आहे. तर एअर टॅक्सीमुळे आपला वेळ आणि पैशांची बचत होईल. एअर टॅक्सीद्वारे प्रवासादरम्यान, चेक इन करण्यासाठी आपल्याला एक तासापूर्वी येण्याची आवश्यकता नाही. आपण फक्त 10 मिनिटांपूर्वी आगमन करुन एअर टॅक्सी विमानात बसू शकता.
तसे पाहता एअर टॅक्सी आपला प्रवास सुकर करेल. परंतु त्यात फक्त एक त्रुटी आहे, ते म्हणजे हवामानानुसार ही टॅक्सी उडेल. जर हवामान स्वच्छ असेल तर आपण एअर टॅक्सीच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता आणि जर तेथे खराब हवामान असेल तर ही टॅक्सी उडणार नाही. म्हणजेच एअर टॅक्सीच्या उड्डाणाची वेळ हवामानावर अवलंबून असेल.