भारताचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागीची निवृत्ती

नवी दिल्ली – भारताचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी याने सर्व प्रकारच क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली त्याने भारतीय संघात पदार्पण केले होते. भारतीय संघात तसेच रणजी संघातही त्याचा विचार झाला नसल्याने 33 वर्षांचा त्यागी निराश झाला होता.

त्याने भारताकडून 4 एकदिवसीय व एक टी-20 सामना खेळला होता. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या त्याच्या पदापर्णाच्या मालिकेत त्याने श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगाकारा याचा बळी घेत थाटात पदार्पण साजरे केले होते. 2009 साली धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध सुदीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

2010 साली त्याने भारतीय संघाकडून अखेरचा सामना खेळला. त्यानंतर त्याला भारतीय संघाकडून पुन्हा संधी मिळाली नाही. आयपीएल 2009 तसेच 2010 साली तो चेन्नई सुपर किंग्सकडून 14 सामने खेळला होता.  सुदीपने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 41 सामने खेळताना 109 बळी घेतले. तर, 23 अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 31 बळी मिळवले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.