संशोधनात तंत्रज्ञान, योग, आयुर्वेदावरही भारताचा भर; पुणे विद्यापीठात ‘इंडो-फ्रेंच नॉलेज समिट’ सुरू

पुणे- भारताने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रात भर देण्याबाबरोबरच सामाजिक सुधारणा करण्यासाठी योग आणि आयुर्वेद यांच्यावरही भर दिला आहे, असे मत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.

भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ करण्यासह शिक्षण, संशोधन आणि नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऑनलाइन पद्धतीने “इंडो-फ्रेंच नॉलेज समिट’ला सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फ्रान्सचे उच्चशिक्षण, संशोधन व नवसंशोधनमंत्री फेडरिक्‍यु विडाल, पृथ्वी विज्ञान व विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम. रवीचंद्रन, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर उपस्थित होते.

कुलगुरू म्हणाले…
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रीसर्च पार्क फाउंडेशनही या सर्व क्षेत्रात काम करत आहे. या माध्यमातून “इंटरडिसीप्लिनरी रीसर्च’ विद्यापीठात केला जात आहे,’ असे प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.