नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय मासिक ‘टाइम’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान दिले आहे. मात्र मोदींचा उल्लेख मासिकाकडून ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ म्हणजेच ‘दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता ‘ असा करण्यात आला आहे. टाइम मासिकाने आशियाच्या आवृत्तीत लोकसभा निवडणुकीवर विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यामधून मोदींच्या पाच वर्षांतील कामाचा आढावा घेण्यात आला आहे. ‘देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का?’ या शीर्षकाखाली हा लेख प्रसिद्ध केला आहे.
मोदी सरकारवर टीका करताना नेहरूंचा समाजवाद आणि भारताची सध्याची स्थितीची तुलना केली आहे. आतिश नासिर या पत्रकाराने लिहलेल्या या लेखात म्हंटले कि, नरेंद्र मोदी यांनी हिंदू आणि मुस्लीमांमध्ये बंधुभाव वाढविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही अथवा तशी इच्छाही दर्शवली नाही. मोदींनी भारताचे महान नेत्यांवर राजकीय हल्ले चढविले. त्यांना काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे.
आतिश यांनी पुढे म्हंटले कि, भारतात कथित उदार संस्कृतीची चर्चा केली जाते. मात्र मोदींचे सत्तेत येणं या संस्कृतीत धार्मिक राष्ट्रवाद, मुस्लिमांविरोधी भावना आणि जातीय कट्टरता किती मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे हे दर्शविते. टाइम मासिकाच्या या लेखात १९८४ शीख दंगली आणि २००२ गुइजरात दंगलीचाही उल्लेख केला आहे.
तासीर यांनी म्हंटले कि, २०१४ मध्ये लोकांच्या मनात असलेला राग आर्थिक आश्वासनामध्ये परावर्तित केला. मोदींनी नोकरी आणि विकासाचे मुद्दे मांडले. परंतु, आर्थिक चमत्कार करणारे सर्व आश्वासने फेल झाली आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी देशात धार्मिक राष्ट्रवादाचे वातावरण तयार करण्यास मदत केली आहे.
दरम्यान, तासीर यांच्या लेखाबरोबरच याच अवृत्तीमध्ये मोदी एक बदल घडवणारा नेता असाही लेख इयन बेरीमेर यांनी लिहिला आहे. या लेखाचा उल्लेखही मासिकाच्या मुखपृष्ठावर करण्यात आला आहे.
TIME’s new international cover: Can the world’s largest democracy endure another five years of a Modi government? https://t.co/oIbmacH9MS pic.twitter.com/IqJFeEaaNW
— TIME (@TIME) May 9, 2019