भारताचा पाकला डिमार्श : वैमानिकाला सुरक्षित परत करण्याची मागणी 

नवी दिल्ली – भारतीय वायुसेनेने जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेवर कारवाई आणि दुसऱ्याचा दिवशी पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा केलेल्या प्रयत्नांमुळे दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यावेळी भारताचा एका विंग कमांडर पाकने पकडले आहे. या पार्श्वभूमीवर विंग कमांडर अभिनंदन यांना सहीसलामत परत करण्यास भारताने पाकला सांगितले आहे. यासंबंधी भारतीय उच्चायोगाने पाकिस्तान परराष्ट्र खात्याला आपत्ती पत्र (डिमार्श) पाठविले आहे. या पत्रामध्ये भारतीय वैमानिकाच्या सुरक्षित सुटकेसाठी मागणी करण्यात आली आहे.

सुत्रांनुसार, भारतीय वैमानिकाच्या सुरक्षित सुटकेसाठी भारतीय उच्चायोगाने पाकिस्तान परराष्ट्र खात्याला आपत्ती पत्र पाठविले आहे. तसेच एक आपत्ती पत्र दिल्लीस्थित पाकिस्तान उच्चायोगाला पाठविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.