नवी दिल्ली – भारतातील करोना रिकव्हरीचा रेट आता 92.79 पर्यंत वाढला आहे. आज सकाळी आरोग्य मंत्रालयाने जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत 44 हजार 281 नवीन करोना रुग्ण आढळून आल्याने देशातील करोना रुग्णांची संख्या आता 86 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यातील 80 लाख 13 हजार रूग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 512 इतकी झाली आहे.
सध्याचे करोनाचे सक्रिय बाधित 4 लाख 94 हजार 657 इतके आहेत.मंगळवारी देशभरात करोनाच्या एकूण 11 लाख 53 हजार 294 चाचण्या घेण्यात आल्या. त्यामुळे देशभरात आत्तापर्यंत करोनाच्या 12 कोटी 7 लाख 69 हजार 151 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरच्यावतीने देण्यात आली आहे.