#ICCWorldCup2019 : भारतीय संघाला विश्‍वचषक जिंकण्याची संधी – अझरुद्दीन

हैदराबाद – 30 मे पासुन इंग्लंड येथे होत असलेल्या विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघ हा विजयाचा मुख्य दावेदार असल्याचे विधान भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने केले आहे.

यावेळी बोलताना अझरुद्दीन म्हणाला की, यंदा भारतीय संघाने विश्‍वचषक स्पर्धेसाठी खुप चांगला संघ निवडला असुन हा संघ भारतीय संघाला विश्‍वचषक जिंकुण देण्याची क्षमता ठेवतो. त्यातच सध्याच्या काळात सर्वात भेदक समजली जाणारी गोलंदाजी ही भारतीय संघाकडे आहे. सर्वांनाच माहिती आहे की इंग्लंड मधील मैदानांवरील खेळपट्ट्यआ या वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्‌टया असतात त्यामुळे तेथे भारतीय संघातील गोलंदाजा आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाज आपल्यातील गुणवत्तेने संघाला विजय मिळवुन देतील याचा मला विश्‍वास आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.