विजयीलय कायम राखण्याचे भारतासमोर आव्हान

विराटच्या अनुपस्थीत रोहित शर्माकडे नेतृत्व

शुभमन गीलला पदार्पणाची संधी मिळणार?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामन्याची वेळ : सकाळी 7.30 पासून

स्थळ : हॅमिल्टन

हॅमिल्टन : पाच सामन्यांच्या मालिकेत आशीच 3-0 अशी विजयी आघाडी घेतलेल्या भारतीय संघापुढे आपली विजयीलय कायम राखण्याचे आव्हान असून आजचा सामना जिंकून न्यूझीलंडसमोर आपली प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान असणार आहे.

पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने पहिले तिनही सामने एकतर्फी जिंकून न्यूझीलंडवर दबाव वाढवला असून न्यूझीलम्डच्या संघाला अद्यापही भारतीय संघातील वेगवान आणि फिरकी माऱ्याचे उत्तर सापडलेले नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारताच्या कुलदीप यादव, युझवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली होती. तर, दुसऱ्या सामन्यातही त्याचीच पुनरावृत्ती पहायला मिळाली होती. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या सलामीवीरांसह आघाडीच्या फळीला भगदाड पाडत भारताला चांगली सुरूवात करुन दिली होती.

पहिल्या दोन्ही सामन्यांप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय संघातील गोलंदाजांसमोर टीकाव धरु शकले नाही. आणि त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही भारताला विजयासाठी फारसा संघर्ष करण्याची गरज भासली नाही. तर, भारतीय गोलंदाजांनी तीनही सामन्यात न्यूझीलंडच्या संपुर्ण संघाला बाद केले होते. तर, तीनही सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला संपुर्ण 50 षटकेही फलंदाजी करता आली नाही हे विशेष. त्याच्या विरुद्ध पहिल्या तिनही सामन्यांमध्ये भारतीय संघातील फलंदाजांनी न्यूझीलंडच्या संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे.

ऑस्ट्रेलिया मधिल मालिका भारतीय संघाने जिंकली असली तरी भारताला ऑस्ट्रेलियातही मुख्यत्वे करुण मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशाने चिंता करायला भाग पाडले होते. मात्र, न्यूझीलंड मध्ये त्याच्या विरुद्ध परिस्थीती अनुभवायला मिलाली आहे. न्यूझीलंद मधील पहिल्या तीनही सामन्यांमध्ये संघातील मधल्या फळीमधिल फलंदाजांनी जबाबदारीचे भान ठेवून फलंदाजी केली असून संघाला विजय मिळवून देऊनच मधल्या फळीतील फलंदाज मैदानातून परतले होते. त्यातल्या त्यात दोन्ही सलामीवीर सध्या भरात असून त्यांनी तिनही सामन्यांमध्ये संघाला चांगली सुरूवात करुन दिली आहे. तर, मधल्याफळीतेल अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिक यांनी संघाला अडचणीत न सापडू देता आपली भुमिका समर्थपणे पार पाडली आहे. तर, हार्दिक पांड्याच्या पुनरागमना नंतर संघात समतोल व्यवस्थित पणे साधला गेला आहे.

प्रतिस्पर्धी संघ –
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, विजय शंकर, शुभमन गिल, खलील अहमद, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टील, टॉम लॅथम, कॉलिन मुन्रो, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, टीम साउदी, रॉस टेलर, कॉलिन डीग्रॅंडहोम, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मॅट हॅन्री, जेम्स नीशाम आणि टॉड ऍस्टल.

विराटच्या जागी शुभमनला संधी?
अखेरच्या दोन सामन्यांत विराट कोहलीला आराम देण्यात आला असून, सलामीवीर रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. तसेच, संघातील त्याच्या जागी शुभमन गिल या युवा फलंदाजाला संधी मिळणार असल्याचे संकेत खुद्द विराट कोहलीने दिले आहेत.

शुभमन गिलची फलंदाजीची शैली विराट कोहलीसारखीच आहे. विराटप्रमाणे तोही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत शुभनमला टीम मॅनेजमेंट संधी देऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. त्यातल्या त्यात शुभमनजवळ न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. कारण अंडर 19 चा विश्‍वचषक हा न्यूझीलंड मध्येच खेळवला गेला होता त्यामुळे अखेरच्या दोन सामन्यांत त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)