नवी दिल्ली – करोनाच्या साथीने निर्माण झालेला आर्थिक परिणाम भरून काढण्यासाठी भारताने मालदीवला 25 कोटी अमेरिकन डॉलर्सची आर्थिक मदत दिली, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.
मालदीवचे पंतप्रधान इब्राहिम मोहंमद सोलिह यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची अपेक्षा व्यकक्त केली होती. त्यानुसार ही मदत देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयात रविवारी झालेल्या या समारंभाला मालदीवचे परराष्ट्रमंत्री अबदुल्ला शहीद, अर्थमंत्री इब्राहिम अमीर, उच्चायुक्त संजय सुधीर उपस्थित होते.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे ट्रेझरी बॉंडच्या विक्रीच्या रूपाने ही मदत देण्यात आली आहे. त्याची मुदत 10 वर्षांची आहे. भारत आणि मालदीव यांच्यात ऐतिहासिक संबंध असून अडचणीच्या वेळी पाठीशी उभे राहण्याच्या भूमिकेतून ही मदत असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.