मुंबईच्या गल्ली बॉयचा ‘अमेरिका गॉट टॅलेंट’मध्ये डंका

मुंबई – अमेरिकेत नुकताच पार पडलेल्या ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये वसई-भाईंदरच्या ‘व्ही अनबिटेबल’ या ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत वसई-भाईंदर येथील ‘व्ही अनबिटेबल’ डान्स ग्रुपला या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा या देशांसह विविध देशांतील ४० संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या सर्वांमधून ‘व्ही अनबिटेबल ग्रूप’ने प्रथम क्रमांक मिळवला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षकांसह प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात या स्पर्धकांचे कौतूक केले.


डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.