भारतीय युवा संघाचा श्रीलंकेला “व्हाईट वॉश’ 

दुसऱ्या कसोटीत एक डाव आणि 147 धावांनी विजय 
हम्बनटोटा: भारतीय युवा संघाने श्रीलंकेच्या संघाचा एक डाव आणि 147 धावांनी पराभव करताना दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी आपल्या खिशात घालत श्रीलंकेला “व्हाईट वॉश’ दिला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारताने श्रीलंकेच्या संघाचा डावाने पराभव केला होता.
तत्पूर्वी, श्रीलंकेच्या युवा संघाचा पहिला डाव अवघ्या 316 धावांत संपुष्टात आल्यानंतर पहिल्या डावात 297 धावांनी पिछाडीवर पडलेल्या श्रीलंकेवर फॉलो-ऑन लादण्यात आल्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर त्यांनी तीन बाद 47 धावांपर्यंत मजल मारली होती. त्या धावसंख्येवरून पुढे खेळताना चौथ्या दिवशी श्रीलंकेचे उर्वरीत 7 फलंदाज केवळ 103 धावांमध्येच परतल्याने त्यांना 147 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
कालच्या 3 बाद 47 धावांवरुन पुढे खेळताना आजच्या दिवशी केवळ आठ धावांची भर घातल्यानंतर कलहारा सेनारत्नेच्या रूपाने श्रीलंकेने आपली चौथी विकेट गमावली. सेनारत्ने बाद झाला तेंव्हा त्यांच्या केवळ 55 धावा झाल्या होत्या. तर पहिल्या डावातील शतकवीर पसिंदु सूरियाबंदरा या डावात केवळ 10 धावा करून परतला. त्यामुळे त्यांची 5 बाद 76 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर संदुन मेंडिसने काही काळ प्रतिकाराचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला आवश्‍यक साथ न मिळाल्याने श्रीलंकेचा डाव लवकर आटोपला.
संदनुने 26 धावांची खेळी केली तर विजयकांत वियासकांथने 16 धावा करत त्याला साथ दिली. यावेळी भारताकडून सिद्धार्त देसाईने 40 धावा देत 4 गडी बाद केले तर आयुश बदोनी व यतिन मंगवानी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली. तत्पूर्वी पसिंदु सूरियाबंदारा आणि सोनल दिनुशा यांच्या 128 धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेने पहिल्या डावांत 316 धावांची मजल मारताना डावाने पराभव टाळण्याची शक्‍यता निर्माण केली होती. सोनलने 51 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर पसिंदुने 115 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. संदनु मेंडिसने एकाकी लढा देताना लंकेला 300 धावांचा टप्पा पार करुन दिला. भारताकडून पहिल्या डावांत मोहित जांग्राने 76 धावा देत 4 गडी बाद केले. तर तर, यतिन मंगवानी, आयुश बदोनी आणि सिद्धार्थ देसाई यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली.
संक्षिप्त धावफलक –
भारतीय युवा संघ- पहिला डाव- 128.5 षटकांत 8 बाद 613 घोषित (पवन शाह 282, अथर्व तायडे 177, नेहल वधेरा 64, आर्यन जुयाल 41, कलहारा सेनारत्ने 177-1, कलाना परेरा 135-1, विजयकांत वियासकांथ 94-1, निपुण मलिंगा 92-1), श्रीलंका युवक संघ- पहिला डाव- 114.3 षटकांत सर्वबाद 316 (पसिंदू सुरियाबंदारा 115, सोनल दिनुशा 51,संदनु मेंडीस 49, कामिल मिशारा 44,, मोहित जांग्रा 76-4, सिद्धार्थ देसाई 84-2), श्रीलंका युवक संघ- दुसरा डाव 62.2 षटकांत सर्वबाद 150 ( नुवानिदु फर्नांडो 28, निशान मदुश्‍का 25, सिद्धार्थ देसाई 40-4 आयुश बदोनी 17-2, यतिन मंगवानी 9-2).
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)