#INDvESP : भारतीय महिला हाॅकी संघाचा स्पेनकडून पराभव

भारतीय महिला हाॅकी संघ सध्या स्पेनच्या दौऱ्यावर आहे. आपल्या स्पेन दौऱ्याची सुरूवात भारतीय महिला संघ अपेक्षाप्रमाणे करू शकला नाही. दौऱ्यातील पहिल्या सामन्यात भारतीय महिला हाॅकी संघाला यजमान स्पेन कडून 3-2 ने पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय संघाकडून सामन्याच्या पहिला सत्रात 12 व्या मिनिटाला उदिताने गोल करत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात भारतीय संघाचा दबदबा राहिला. मात्र दुसऱ्या सत्रात यजमान स्पेन संघाने पुनरागमन करत 23 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. मारिया टोस्टने 23 व्या मिनिटाला गोल केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर दुसऱ्या सत्रात स्पेनने आपला आक्रमक खेळ कायम राखत सामन्याच्या 39 आणि 40 व्या मिनिटाला गोल करत 3-1 ची मजबूत आघाडी घेतली. स्पेनकडून 39 व्या मिनिटाला लोला तर 40 व्या मिनिटाला गार्सियाने गोल केला. त्यानंतर 48 व्या मिनिटाला गुरजीत कौरने पेनल्टी काॅर्नरव्दारे गोल करत भारतीय संघाला सामन्यात परत आणले मात्र त्यानंतर भारतीय संघाला गोल करण्यात अपयश आल्याने पराभवाला सामोरे जावे लागले.

https://twitter.com/TheHockeyIndia/status/1089235826142105600

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)