नवी दिल्ली : स्काॅटलंडमधील रेंजर्स फुटबाॅल क्लबने बुधवारी गानगोम बालादेवी या भारतीय महिला फुटबाॅटपटूला करारबध्द केल्याची घोषणा केली आहे. २९ वर्षीय बालादेवी हिच्याशी क्लबने दीड वर्षाचा करार केला आहे.
🆕📝 #RangersFC are delighted to announce the signing of @IndianFootball attacker Bala Devi, subject to international clearance.
➡️ https://t.co/Z6qojndUTv pic.twitter.com/A3QkfqAduS
— Rangers Women (@RangersWFC) January 29, 2020
परदेशातील क्लबशी करारबध्द होणारी बालादेवी ही भारतातील पहिली महिला फुटबाॅलपटू ठरली आहे. तसेच ती रेंजर्स फुटबाॅल क्लबची पहिलीच आशियाई खेळाडूसुध्दा ठरली आहे.
Congratulations to Bala Devi, India's first female professional footballer! 🇮🇳
Best wishes to @10Ngbala at @RangersWFC! 👏#IndianFootball pic.twitter.com/3cqY0Ww7OC
— Tottenham Hotspur (@Spurs_India) January 30, 2020
बालादेवी भारतीय महिला फुटबाॅल संघाची सर्वाधिक गोल करणारी सध्याची खेळाडू आहे. तिने २०१० पासून भारतीस संघाकडून ५८ सामन्यात ५२ गोल केले आहेत.