पर्शियन खाडीत भारतीय युद्धनौका तैनात

या युद्धनौका भारतीय ध्वज असलेल्या व्हेसलचे संरक्षण करणार

चेन्नई: पेट्रोलची आयात आणि सौदीच्या दोन तेलांच्या टॅंकरवर झालेल्या हल्ल्यांमुळे अमेरिका आणि इराण संबंध युद्धजन्य झाले असतानाच इराणने अमेरिकेचे टेहळणी ड्रोन पाडल्याने परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. पर्शियन खाडीमध्ये अत्यंत तणाव निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारताने दोन युद्धनौका तैनात केल्या आहेत.
भारतीय युद्धनौका भारतीय ध्वज असलेल्या व्हेसलचे संरक्षण करतील, असे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के.शर्मा यांनी सांगितले. भारताने आयएनएस चेन्नई आणि आयएनएस सुनन्या तसेच समुद्र टेळहणी विमान तैनात केले आहे. अमेरिकन नौदलाचे टेहळणी ड्रोन इराणने पाडल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला. इराणच्या हवाई हद्दीचे ड्रोनकडून उल्लंघन झाल्याने ते पाडण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे.

पर्शियन खाडी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग आहे. जागतिक उर्जा आणि भारताचा 40 टक्के उर्जा प्रवाह याच मार्गातून जातो. गेल्याच आठवड्यात याच विभागात जपान आणि नॉर्वेच्या इंधन टॅंकरवर हल्ला झाला. त्यावेळी इराणकडून हा हल्ला झाल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.

इराणने अमेरिकेचे टेहळणी ड्रोन पाडल्याने त्याचा परिणाम विमानसेवेवरही झाला आहे. यूनायटेड एअरलाईन्सने सुरक्षेच्या कारणास्तव न्यूयॉर्क येथून मुंबईकडे इराणच्या हवाई हद्दीतून येणारी विमानसेवा रद्द केली आहे. ही विमानसेवा रोज संध्याकाळी न्यूयॉर्क येथील न्यजर्सी एअरपोर्ट ते मुंबई एअरपोर्ट अशी असते.

Leave A Reply

Your email address will not be published.