#indian vs pakistan : पुण्यातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये रंगणार ‘भारत-पाकिस्तान’ सामना

पुणे – टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा सध्या संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा सामना रविवारी म्हणजेच, 24 ऑक्‍टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धींमध्ये खेळवला जाणार आहे.

दरम्यान, हा महत्वपूर्ण सामना क्रिकेट प्रेमींना मोठ्या पडद्यावर पाहण्याची सोय चित्रपटगृह चाकांची उपलब्ध करून दिली आहे. रविवार दि. 22 तारखेपासून सर्व चित्रपटगृह खुली होणार आहेत.

शहरातील विविध ठिकाणच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये हा सामना दाखविण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल चारशे ते हजार रुपयांपर्यंतचे तिकिट ठेवण्यात आले आहे.

गेल्या दीड वर्षांपासून करोनामुळे चित्रपटगृह बंदच ठेवण्यात आल्यामुळे चित्रपटगृहात जाऊन सहकुटुंब किंवा मित्रमैत्रिणींसमवेत चित्रपट पाहाण्याच्या आनंदाला प्रेक्षकवर्ग मुकला होता.

परंतु आता लवकरच प्रेक्षकांना हा आनंद घेता येणार आहे. दरम्यान, आता मल्टिप्लेक्स चाकांची लढवलेल्या या युक्तीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतोय हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.