#INDvENG : भारताची मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी

चेन्नई – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून विजयी होऊन परतलेल्या भारतीय संघासमोर आता मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विजयी सातत्य राखण्याचे आव्हान आहे. या दोन संघांतील कसोटी मालिकेला येत्या शुक्रवारपासून येथे पहिल्या कसोटी सामन्याने प्रारंभ होत आहे.

इंग्लंडचा संघ भारताविरुद्धच्या दौऱ्यात 4 कसोटी, 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिले दोन्ही कसोटी सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-20 मालिका अहमदाबादमध्ये तर, एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तीनही सामने पुण्यात होणार आहे.

इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक

पहिला कसोटी सामना : 5 ते 9 फेब्रुवारी चेन्नई (सकाळी 9:30 वाजल्यापासून)
दुसरा कसोटी सामना  : 13 ते 17 फेब्रुवारी चेन्नई (सकाळी 9:30 वाजल्यापासून)
तिसरा कसोटी सामना : 24 ते 28 फेब्रुवारी अहमदाबाद (दिवस-रात्र) भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरू होईल.
चौथा कसोटी सामना : 4 ते 8 मार्च अहमदाबाद (सकाळी 9:30 वाजल्यापासून)

टी-20 सामने –

12 मार्च, पहिला सामना, सायंकाळी सहा वाजल्यापासून
14 मार्च, दुसरा सामना, सायंकाळी सहा वाजल्यापासून
16 मार्च, तिसरा सामना, सायंकाळी सहा वाजल्यापासून
18 मार्च, चौथा सामना, सायंकाळी सहा वाजल्यापासून
20 मार्च, पाचवा सामना, सायंकाळी सहा वाजल्यापासून

एकदिवसीय सामने –

23 मार्च, पहिला सामना, दुपारी 2.30 पासून
26 मार्च, दुसरा सामना, दुपारी 2.30 पासून
28 मार्च, तिसरा सामना, दुपारी 2.30 पासून

थेट प्रक्षेपण –

स्टार स्पोर्टस वाहिनीवरून…

भारतीय संघ – रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक आग्रवाल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, लोकेश राहुल, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्‍सर पटेल, रवीचंद्रन अश्‍विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, महंमद सिराज, शार्दुल ठाकूर.

इंग्लंडचा संघ – ज्यो रुट (कर्णधार), रॉरी बर्न्स, डॉमनिक सिबली, जॅक क्रावली, डॅनियल लॉरेन्स, ऑलिव्हर स्टोन, बेन स्टोक्‍स, जोस बटलर, मोईन अली, बेन फोक्‍स, ख्रिस वोक्‍स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, डॉमनिक बेस, जॅक लीच.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.