दुबई: आबुधाबी येथे संजय नाथ आर या प्रवासी भारतीयास 19 कोटी रुपयांची लॉटरी लागली असल्याची माहिती खलीज टाईम्सया स्थानिक वृत्तपत्राने दिली आहे. या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार संजय यांना एक कोटी दिरहमची (19 कोटी रुपये) लॉटरी लागली आहे. संजय नाथ यांच्यासह इतर पाच भारतीय प्रवासीही बिग टिकेट आबुधाबी लॉटरीच्या पहिल्या 10 मध्ये विजेता ठरले आहेत.
बिग टिकेट आबुधाबी येथे बक्षीस म्हणून रोख रक्कम आणि अलिशान गाड्यांची भेट देणारा सर्वात मोठा मासिक लकी ड्रॉ आहे. आबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिटी टर्मिनल किंवा ऑनलाईन पद्धतीने या लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यात येते. दरम्यान, मागील महिन्यात बिग टिकेट लॉटरीमध्ये शारजाह येथील रहिवासी मूळचे भारतीय असणारे शोजित के.एस. यांनी 1.5 कोटी दिरहम जिंकले होते.