प्रज्ञेश गुणेश्‍वरन व अंकिता रैना कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानी

नवी दिल्ली  – भारतीय टेनिस खेळाडू प्रज्ञेश गुणेश्‍वरन व अंकिता रैना यांनी एटीपी व डब्ल्यूटीएच्या ताज्या एकेरी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानी झेप घेतली आहे. अंकिता डब्ल्यूटीए क्रमवारीत 35 स्थानांच्या फायद्यासह कारकिर्दीतील सर्वोच्च 168 व्या स्थानी पोहोचली आहे. तर, ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत पराभूत झालेला प्रज्ञेश हा 102 व्या स्थानी पोहोचला आहे.

क्रमवारीत सर्वात वर असलेली भारतीय महिला खेळाडू असलेल्या अंकिताने गेल्या रविवारी सिंगापूरमध्ये झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अरांत्झा रसला नमवित विजेतेपद पटकावले होते. त्याचाच फायदा तिला क्रमवारीत झाला. दुहेरी क्रमवारीत तिची पाच स्थानांची घसरण झाली व ती 165 व्या स्थानी पोहोचली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डब्ल्यूटीए दुहेरी क्रमवारीत प्रार्थना ठोंबरे ही 140 व्या स्थानी आहे. तर, करमन कौर थंडीने ही दुहेरीत 191 व्या तर, एकेरीत 210 व्या स्थानी आहे. एटीपी क्रमवारीत प्रज्ञेशनंतर रामकुमार रामनाथन 132 व्या स्थानी आहे. एक स्थानाच्या सुधारासह या खेळाडूच्या नावे 425 रेटिंग गुण आहेत.

दुखापतग्रस्त युकी भांबरी कोर्टपासून दूर असल्याने त्याचा फटका त्याला क्रमवारीत झाला. 365 रेटिंग गुणांसह तो 150 व्या स्थानी आहे. तर, एटीपी दुहेरी क्रमवारीत रोहन बोपन्ना हा 2095 रेटिंग गुणांसह 37 व्या तर, दिविज शरण 40 व्या स्थानी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)