आयबीएमच्या स्पर्धेत पुण्याच्या पथकाचे यश

न्युयॉर्क : पूर रोखण्यासाठी आयबीएम कंपनीने घेतलेल्या स्पर्धेत भारतीय सॉफ्टवेअर व्यावसायिकांनी पाच हजार अमेरिकन डॉलर्सचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

पुण्याच्या कॉग्नीजंटमधील सिद्दम्मा तिगाडी, गणेश कदम, संगिता नायर आणि श्रेयस कुलकर्णी यांच्या पथकाने तयार केलेल्या पूर्वसूचक हा मान पटकावला. पाणीसाठे, धरणे आणि नदीतील पाणी पातळी आणि हवामान खात्यांचे अंदाज यांची सांगड यात घालण्यात आली आहे.

यातून पुराचा परिणामकारक अंदाज आधी बांधता येऊ शकेल. त्यामुळे जीवीत व वित्त हानी रीकता येऊ शकेल असे आयबीएमच्या पत्रकात म्हटले आहे. या स्पर्धेत भारतीय उपखंडातील 15 देशातील स्पर्धक सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.