ICC Champions Trophy 2025 : पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीने बोर्डाच्या सर्व सदस्यांची बैठक बोलावली होती. ही बैठक आज होणार होती पण आता आयसीसीने ती पुढे ढकलल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता ही बैठक शनिवारी म्हणजेच उद्या होणार आहे. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत एक मोठे विधान जारी केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात काय म्हटले आहे…
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात भारत सरकारने मोठे विधान केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, “तेथे सुरक्षेची चिंता आहे आणि त्यामुळे टीम तेथे जाण्याची शक्यता नाही.”
#WATCH | Delhi: On Indian cricket team participating in Pakistan, MEA Spokesperson Randhir Jaiswal says, “… The BCCI has issued a statement… They have said that there are security concerns there and therefore it is unlikely that the team will be going there…” pic.twitter.com/qRJPYPejZd
— ANI (@ANI) November 29, 2024
आता या विधानामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानामध्ये आयोजित करण्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण पाकिस्तानने अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हायब्रीड मॉडेलनुसार करण्यास सहमती दर्शवलेली नाही.
पाकिस्तानने मान्य न केल्यास ICC घेईल मोठा निर्णय
जर पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्यास सहमत नसेल तर अशा परिस्थितीत आयसीसी पाकिस्तानकडून यजमानपदाचे हक्क हिसकावून घेऊ शकते. कारण भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणे अजिबात अवघड आहे.
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भारताला दिल्यास सरकारही खूप मदत करेल, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. भारताशिवाय दक्षिण आफ्रिकेलाही यजमानपद मिळू शकते.
2013 मध्ये भारतानं मिळवलं होते विजेतेपद…
भारताने शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघ पावसाने प्रभावित झालेल्या वनडे सामन्यात इंग्लंडला पराभूत करण्यात यशस्वी ठरला होता. 50 षटकांचा सामना 20 षटकांचा करण्यात आला. या सामन्यात मेन इन ब्लूने इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला.