लंडन – जगातील ३५ देशांमधील पाहणीनंतर विश्वसनीयतेमध्ये भारतीय शिक्षक सहाव्या स्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाहणीच्या निष्कर्ष अहवालात चीन आणि मलेशिया या देशांनी भारताच्या पुढे स्थान मिळवले आहे.
ब्रिटेनमधील वार्के फाउंडेशनने केलेल्या या पाहणीचे निष्कर्ष गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले. घाना सिंगापूर आणि कॅनडा हे देशहि या यादीत भारताच्या पुढे आहेत स्वतः विदयार्थ्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
करोना संकटाच्या काळात जगातील १५० कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. या काळात विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संबंध महत्वाचे आहेत. विविध देशात या संबंधाची वेगवेगळी पातळी पाहायला मिळाली अशी माहिती वार्के फाउंडेशन आणि ग्लोबल टीचर प्राइजचे संस्थापक सन्नी वार्के यांनी दिली.