नवी दिल्ली – चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने प्रत्यक्ष ताबा रेषेवर सैन्य वाढवले आहे. दौलत बेग ओल्डी, देप्सांग भागात हा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. चीनने ही आगळीक केल्यानंतर भारतोही या भागात रणगाडे आणि प्रचंड दारूगोळा तैनात केला आहे. चीनने कोणतीही आक्षेपार्ह कृती केल्यास तोडीस तोड उत्तर देण्याची योजना भारताने आखली आहे.
तोफखाना विभागातील टी 90 रणगाडे या भागात तैनात करण्यात आले अहोत. ओल्डी आणि देप्सांगमध्ये आम्हीही मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. टी 90 रणगाड्यांचे पथक तेथे पाठवण्यात आले आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त एएनअय वृत्तसंस्थने दिले आहे.
एप्रिल मे मध्ये झालेल्या पहिल्या धुमश्चक्रीनंतर चीनने तेथे जवळपास 17 हजार सैनिक तैनात केले आहेत. त्यामुळे भारताने गस्तीनाका क्र. 1 पासून भारतीय लष्कराला तैनात करण्यात आले आहे. हा भाग देस्पांगकडे जाणाऱ्या कोराकोरम मार्गालगत आहे.
चीनने या भागात कोणतीही आगळीक केल्यास परिस्थितीला सामोरे जाणे कठीण जाणार आहे, असे लष्करातील सुत्रांचे म्हणणे आहे.