Indian Students Faces Violence । परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी हाच मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यांनी परराष्ट्र राज्यमंत्र्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या किती भारतीय विद्यार्थ्यांना हिंसक हल्ल्यांना सामोरे जावे लागले.? असा सवाल केला होता. त्यांनी केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय मंत्र्यांनी लेखी उत्तरात भारतीय विद्यार्थ्यांवरील सर्वाधिक हल्ले रशिया, अमेरिका, जर्मनी आणि कॅनडामध्ये झाले असल्याचे म्हटले आहे. टीएमसी खासदाराने याला धक्कादायक आकडा म्हटले आहे.
सागरिका घोष यांनी परराष्ट्र राज्यमंत्र्यांकडून मिळालेले लेखी उत्तर पोस्ट करत, ‘हे धक्कादायक आहे. मी संसदेत परराष्ट्र मंत्रालयाला विचारले की परदेशात शिक्षण घेणाऱ्या किती भारतीय विद्यार्थ्यांना हिंसक हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. २०२३ आणि २०२४ मध्ये परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवरील हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे.” असे त्यांनी म्हटले.
टीएमसी खासदाराने भारतीय विद्यार्थ्यांशी संबंधित चार प्रश्न विचारले Indian Students Faces Violence ।
१- किती भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले?
२- भारतात किती परदेशी विद्यार्थी आले?
३- परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली गेली आहेत?
४- गेल्या ५ वर्षांत, किती भारतीय विद्यार्थ्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागला आणि कोणत्या देशात?
किती भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले? Indian Students Faces Violence ।
टीएमसी खासदाराच्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी, “२०२२ मध्ये ७,५२,१११, २०२३ मध्ये ८,९४,७८३ आणि २०२४ मध्ये ७,६०,०७३ भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले.” असे म्हटले. तसेच परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी, “२०२२ मध्ये ३९,२०२ विद्यार्थी इतर देशांमधून भारतात शिक्षण घेण्यासाठी आले होते, २०२३ मध्ये ४९,४३७ आणि २०२४ मध्ये ५६,५३८ विद्यार्थी शिक्षणासाठी आले होते.” अशी माहिती दिली.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी, “परदेशात भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सरकारच्या प्राधान्यांपैकी एक आहे. आम्ही इतर देशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात असतो. इतर देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी भारतीय मिशनकडून स्वागत समारंभ आयोजित केले जातात.” असेही म्हटले.
कोणत्या देशात किती विद्यार्थ्यांवर हल्ले ?
या प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी, २०२० मध्ये रशियामध्ये एका विद्यार्थ्याविरुद्ध आणि कॅनडामध्ये दोन विद्यार्थ्यांविरुद्ध हिंसाचार झाला. २०२१ मध्ये आयर्लंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला झाला होता. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामध्ये प्रत्येकी एका विद्यार्थ्यावर हल्ला झाला. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये दोन, अमेरिकेत चार, इटलीमध्ये सात, रशियामध्ये १२, कॅनडा, आयर्लंड आणि इराणमध्ये प्रत्येकी एक विद्यार्थ्यांवर हल्ला झाला, तर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये एका, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये प्रत्येकी चार, इटलीमध्ये तीन, रशियामध्ये दोन, कॅनडामध्ये नऊ, आयर्लंडमध्ये तीन, जर्मनीमध्ये ११ आणि फिलीपिन्समध्ये तीन विद्यार्थ्यांवर हल्ला झाला.