भारतीय – श्रीलंकेच्या नौदलादरम्यान सागरी सराव उद्यापासून

नवी दिल्ली – भारतीय आणि श्रीलंकेच्या नौदलादरम्यान स्लीनेक्‍स -20 हा आठवा सागरी सराव 19 ते 21ऑक्‍टोबर दरम्यान श्रीलंकेच्या त्रिनकोमाली येथे होणार आहे. श्रीलंका नौदलाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर ऍडमिरल बंडारा जयथीलाक यांच्या नेतृत्वाखाली “एसएलएन’ शिप्स सयूरा आणि गजबाहू श्रीलंका नौदलाचे प्रतिनिधित्व करतील.

इस्टर्न फ्लीटचे कमांडिंग फ्लॅग ऑफिसर रियर ऍडमिरल संजय वत्सयन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बनावटीच्या “एएसडब्ल्यू’ कॉर्वेटेस कामोर्ता आणि किलता भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व करतील. याव्यतिरिक्त, भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर प्रगत आणि चेतक जहाजांवर आहेत. तसेच डोर्निअर मेरीटाइम पॅट्रोल विमानही यात सहभागी होणार आहेत. यापूर्वी सप्टेंबर 2019 मध्ये विशाखापट्टणममध्ये स्लीनेक्‍स सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

याव्यतिरिक्त, या सरावामध्ये आपल्या देशी बनावटीची नौदल जहाजे आणि विमानांची क्षमता देखील दर्शविली जाईल. शस्त्रास्त्र गोळीबार, सीमॅनशिप इव्होल्यूशन, मानोव्हर्स आणि क्रॉस डेक फ्लाइंग ऑपरेशन्स सह पृष्ठभाग आणि हवा विरोधी प्रात्यक्षिकांचे नियोजन या सरावादरम्यान केले गेले आहे,

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.