‘भारतीय सैन्याने ताकद दाखवली’: देवेंद्र फडणवीस

मुंबई – पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली असून पाकवर कारवाई करण्याची मागणी होत होती. आज भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले आहेत.

या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली कि,”भारतीय सैन्याने ताकद दाखवली. जवानाचं बलिदान वाया जाऊ देणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वायुसेनेचं कौतुक केलं आहे. हवाई दलाचे आणि सैन्य दलाचे मी अभिनंदन करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेली गोष्ट झाली. अशाप्रकारचा कोणताही हल्ला भारत खपवून घेणार नाही

Leave A Reply

Your email address will not be published.