भारतीय जवान कुलदीप जाधव यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू

श्रीनगर – भारतीय सैन्यदलाच्या सेवेत असलेले नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्‍यातले कुलदीप जाधव यांचा काल कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. जाधव हे जम्मू काश्‍मीरमेधे राजौरी भागात कार्यरत होते. या भागातल्या थंडीमुळे झोपेतच जाधव यांचा मृत्यु झाला अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. 

मूळचे पिंगळवाडे गावचे आणि बागलाण तालुक्‍यातील सटाणा शहरात वास्तव्यास असलेले कुलदीप यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कठोर मेहनत घेऊन ते भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते. जम्मू काश्‍मीरच्या राजोरी सेक्‍टरमध्ये प्रचंड रक्त गोठविणाऱ्या थंडीत ते देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना शहिद झाले.

जाधव दाम्पत्याला नुकताच मुलगा झाला. मुलाला पाहण्यासाठी ते रजेवर पिंगळवाडी या आपल्या मुळ गावी येणार होते. पण त्याआधीच त्यांच्या निधन झाले. आज रात्री उशीरा त्यांचे पार्थिव आधी मुंबईत आणि त्यानंतर त्यांच्या मुळगावी आणले जाईल. तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती सटाणा पोलीसांनी दिली आहे. कुलदीप जाधव हे गेल्या चार वर्षांपासून सैन्यदलात कर्तव्य बजावत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.