#T20WorldCup : भारतीय संघाने केला श्रीलंकेच्या खेळाडूचा गौरव

मेलबर्न – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असलेल्या श्रीलंकेच्या शशिकला सिरिवर्धने या खेळाडूचा खास गौरव भारताच्या महिला संघाने केला. शशिकला हिला भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत सिंग हिने आपली जर्सी भेट दिली. 

सोमवारी श्रीलंका संघाने बांगलादेशचा पराभव केला हा सामना शशिकलाचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी तिचा सत्कार केला.
महिला क्रिकेटमधील योगदानाबद्दल हरमन प्रीतसह भारतीय संघाच्या अनेक खेळाडूंनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हरमनप्रीतच्या जर्सीवर भारतीय महिला खेळाडूंनी संदेश लिहिला व ही जर्सी शशिकला हिला भेट दिली.

शशिकलाने 2003 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 118 एकदिवसीय सामने खेळताना तिने 2 हजार 29 धावा केल्या. तिने 81 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळत 1 हजार 97 धावा केल्या आहेत. तिने गोलंदाजीतही चमक दाखविताना 201 बळीही मिळविले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.