पुणे – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या वतीने व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित एमएसएलटीए अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत देशभरांतून 100 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
हि स्पर्धा एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट आजपासून सोमवारपर्यंत रंगणार आहे. स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, कोल्हापुर, सांगली, नगर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापुर, गुजरात, छत्तीसगड येथुन प्रवेशीका आल्या आहेत. स्पर्धेसाठी तेजल कुलकर्णी यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक व गुण देण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी –
मुले – 1) नीरज रिंगणगावकर, 2) शौर्य घोडके, 3) स्वराज ढमढेरे, 4) आदित्य आयंगर, 5) अहान शेट्टी, 6) अयान शेट्टी, 7) पृथ्वीराज हिरेमठ, 8) वरद पोळ. मुली – 1) प्रिशा शिंदे, 2) देवांशी प्रभुदेसाई, 3) आदिती रॉय, 4) सेरेना रॉड्रिक्स, 5) आर्या बोरकर, 6) सलोनी परिदा, 7) मेहक कपूर, 8) निशिता देसाई.