सणासुदीच्या दिवसात पश्चिम रेल्वेच्या 24 विशेष गाड्या धावणार; आजपासून बुकिंग सुरू

नवी दिल्ली – सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेने अधिक विशेष गाड्या चावण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा, दिवाळी सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी 24 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांच्या 156 फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेने ट्विटद्वारे दिली आहे.

पश्चिम रेल्वेने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 12 जोड्या विशेष गाड्यांपैकी 5 जोड्या वांद्रे टर्मिनसहून, 2-2 जोड्या इंदूर आणि अधनाहून धावणार आहेत. तर प्रत्येकी 1-1 जोड्या पोरबंदर व गांधीधाम स्टेशनहून धावणार आहेत. तसेच या सर्व गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत.

तसेच पूर्णपणे आरक्षित असलेल्या या गाड्यांचे बुकिंग 17 ते 22 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. असेही पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.