नवी दिल्ली – कोरोनाव्हायरस दरम्यान रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा देणारा निर्णय भारतीय रेल्वेने ( indian railways ) घेतला आहे. रेल्वेने अनेक गाड्यांच्या फेऱ्यांचा कालावधी वाढविला आहे, त्याचबरोबर काही साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचीही घोषणा केली आहे. रेल्वेच्या या घोषणेनंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वेने विशेष गाड्यांच्या फेऱ्यांचा कालावधी वाढविला आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ज्या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत अशा गाड्यांसाठी 23 जानेवारीपासून तिकिटे बुक करता येणार आहेत.
या साप्ताहिक विशेष गाड्या धावतील –
पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद ते पुणे, भुज-पुणे आणि कोठी-पुणे दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. याशिवाय दररोज दिल्ली सराय रोहिल्ला-बिकानेर-दिल्ली सराय रोहिल्ला प्रतिदिन विशेष ट्रेन चालविली जात आहे.
या गाड्यांचा कालावधी वाढविला –
रेल्वेने वाढविलेल्या गाड्यांमध्ये हावडा ते धनबाद, भुवनेश्वर-आनंद विहार स्पेशल ट्रेनसह इतरही विशेष रेल्वेचा समावेश आहे.
ट्रेन क्रमांक 09608 / 09607: मदार-कोलकाता-मदार साप्ताहिक विशेष ट्रेन 1 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत (दर सोमवारी) आणि कोलकाता हून 04 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंत (दर गुरुवारी) फेरी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक 02323 / 02324: हावडा-बाडमेर-हावडा साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल विशेष गाड्यांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. उत्तर पश्चिम रेल्वेनुसार, हावडा 29 जानेवारी 2021 ते 26 मार्च 2021, तर बाडमेर हून 3 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत धावेल.
ट्रेन क्रमांक 02324: बाडमेर हावडा एक्सप्रेस – 03 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान धावेल.
ट्रेन क्रमांक 02819: भुवनेश्वर आनंदविहार एक्स्प्रेस – 02 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान धावेल.
ट्रेन क्रमांक 02820: आनंदविहार भुवनेश्वर एक्स्प्रेस – 04 फेब्रुवारी ते 02 एप्रिल दरम्यान धावेल.
ट्रेन क्रमांक 02331: हावडा जम्मूतवी हिमगिरी एक्सप्रेस – 30 जानेवारी ते 30 मार्च दरम्यान धावेल.
ट्रेन क्रमांक 02332: जम्मू तवी हावडा हिमगिरी एक्सप्रेस – 01 फेब्रुवारी ते 01 एप्रिल दरम्यान धावेल.
ट्रेन क्रमांक 03019: हावडा काठगोदाम बाग एक्स्प्रेस – 31 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान धावेल.
ट्रेन क्रमांक 03020: काठगोदाम हावडा बाग एक्सप्रेस – 02 फेब्रुवारी ते 02 एप्रिल दरम्यान धावेल.