आजपासून ‘या’ सर्व रेल्वेचे वेळापत्रक बदलले, प्रवासापूर्वी तपासा ‘ही’ यादी…!

नवी दिल्ली – 1 डिसेंबरपासून भारतीय रेल्वेने अनेक गाड्यांची वेळ बदलली आहे. जर आपण कुठे प्रवास करण्याची योजना आखत असाल तर त्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासून घ्या. पश्चिम रेल्वेने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. भारतीय रेल्वेने या गाड्यांच्या वेळेची नवी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये राजधानी आणि शताब्दी गाड्यांसह पश्चिम रेल्वेच्या काही विशेष गाड्यांची नावे आहेत.

रेल्वेने ट्विटद्वारे माहिती दिली
पश्चिम रेल्वेने ट्विट केले आहे की, ‘परिचालन कारणास्तव, 1 डिसेंबर 2020 पासून राजधानी आणि शताब्दी गाड्यांसह पश्चिम रेल्वेच्या काही विशेष गाड्यांमध्ये बदल केले जाईल’.

जाहीर केली रेल्वेच्या  वेळेची यादी 
रेल्वेने जाहीर केलेल्या यादीनुसार, राजधानी व शताब्दी एक्सप्रेस मुंबईहून सुरू होण्याच्या काळात बदल करण्यात आला आहे. यासह, मुंबई मध्य-नवी दिल्ली राजधानी बोरिवली स्थानकात अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांना या मार्गांवर सोयीची सुविधा मिळणार आहे.

– मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी स्पेशल एक्सप्रेस (दररोज, ट्रेन क्र. 02951/02952)
– मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी स्पेशल एक्सप्रेस (दररोज, ट्रेन क्र. 02953/02954)
– मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी स्पेशल एक्सप्रेस (आठवड्यातून 6 दिवस, ट्रेन क्रमांक 02009/02010)

विशेष गाड्या 31 डिसेंबरपर्यंत धावतील
रेल्वेने इतर अनेक गाड्यांचे वेळापत्रकदेखील बदलले आहे. कोरोना कालावधीत नियमित गाड्या बंद आहेत, परंतु प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विशेष गाड्या चालवित आहे. रेल्वेने 31 डिसेंबर 2020 पर्यंत काही पूजा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमधील सर्व डबे आरक्षित प्रवर्गाचे असतील आणि त्यामध्ये प्रवास करणाऱ्यांना कोविड -19 च्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.