मनमोहनसिंग-राजन यांच्या काळातच बॅंकाची अवस्था वाईट : सीतारामन

कोलंबिया : पंतप्रधान मनमोहनसिंग आणि रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या काळात बॅंकाची स्थीती खूपच वाईट होती, असा धक्कादायक दावा भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला.

येथील कोलंबिया विद्यापीठाच्या महाविद्यालयात सीतारामन बोलत होत्या. त्या म्हणाल्या, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना जीवदान देणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. एक बुध्दीमान अभ्यासक म्हणून राजन यांच्याविषयी मला आदर आहेच. भारतीय अर्थव्यवस्था सशक्त अवस्थेत असताना त्यांना रिझर्व्ह बॅंकेत घेण्यात आले. अधिकार एकवटल्याने आणि नेतृत्वाकडे अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काय करायचे याच्या कल्पना नसल्यामुळे नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मोदी सरकार फार काही करू शकले नाही, अशी टीका राजन यांनी केली होती. त्याकडे लक्ष वेधले असता, त्या म्हणाल्या, त्यापेक्षा रिझर्व्ह बॅंकेचे ते प्रमुख असताना झालेल्या कर्जवाटपाचा घॅळ अधिक मोठा आहे.

प्रभावशाली नेत्यांचा फोन आल्यावर बॅंका कर्ज देण्याचा प्रघात राजन हे रिझर्व्ह बॅंखेचे गव्हर्नर असताना पडला होता, असा आरोप त्यांनी केला. मनमोहनसिंग हे पंतप्रधान असताना आणि राजन हे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर असतानाच देशातील बॅंकाची स्थिती अत्यंत वाइट होती, हे आम्हाला अत्ता समजले, असे त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.