#AUSvIND : भारतीय खेळाडूंचा लाल आणि पांढऱ्या चेंडूवर एकाचवेळी सराव

मेलबर्न – ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंसाठी रविवारी पूर्णवेळ नेट सेशन आयोजित केले होते. या नेट सेशनमध्ये सर्व खेळाडूंनी लाल आणि पांढऱ्या चेंडूवर एकाचवेळी सराव केला. तत्पूर्वी, शनिवारी पहिल्या प्रशिक्षण सत्रात खेळाडूंनी जिम व धावण्याच्या वर्कआउट केले होते, तर दुसऱ्याच दिवशी खेळाडू नेटमध्ये सराव करताना दिसले. या

सराव सत्राचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया फीडवर शेअर केला आहे. यात कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे स्लिपमध्ये लाल चेंडूसह झेल घेताना दिसतात. दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन नेटवर पांढऱ्या चेंडूवर गोलंदाजी करीत होता. तसेच चेतेश्वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, पृथ्वी शॉ, षभ पंत, आर. अश्विन यांनी फक्त लाल चेंडूचे प्रशिक्षण घेतले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.