हंड्रेड लीगमध्येही भारतीय खेळाडूंनी सहभागी व्हावे – इयॉन मॉर्गन

मुंबई – भारताच्या क्रिकेटपटूंनीही द हंन्ड्रेड लीगमध्ये सहभागी व्हावे, असे मत इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने व्यक्‍त केले आहे. माझे अनेक भारतीय क्रिकेटपटूंशी बोलणे झाले आहे. भारताच्या खेळाडूंना हंन्ड्रेड लीगसह परदेशातील अन्य लीगमध्येही खेळण्याची इच्छा आहे. मात्र, त्यांना व्यस्त वेळापत्रकामुळे खेळायला मिळत नाही, असेही त्याने म्हटले आहे.

भारताच्या खेळाडूंना परेदशात कुठेही खेळायचे असेल तर त्यांना बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते. जर बीसीसीआयची परवानगी नसेल तर त्यांना परदेशात खेळता येत नाही. त्याचबरोबर जर खेळाडूने बीसीसीआयच्या परवानगीशिवाय खेळण्याचा प्रयत्न केला तर त्याला भारतामध्ये क्रिकेट खेळता येत नाही. त्यामुळेच भारताचे जास्त खेळाडू परदेशातील लीगमध्येही खेळताना दिसत नाहीत.

भारतीय खेळाडूंना परदेशात जास्त मागणी आहे. त्याचबरोबर त्यांचे चाहतेही परदेशात जास्त आहेत. पण भारतीय खेळाडू नावाजलेल्या टी-20 लीगमध्ये खेळताना दिसत नाहीत. भारतीय खेळाडूंना परदेशातील लीगमध्येही खेळायचे आहे. इंग्लंडमध्येही द हंन्ड्रेड लीग होते. या लीगमध्येही भारतीय खेळाडूंना खेळण्याची इच्छा आहे. बीसीसीआयनेही त्यांना परवानगी दिली पाहिजे, असेही मॉर्गनने म्हटले आहे.

…परवानगी द्यावी

भारतीय खेळाडू परदेशात खेळायला लागले तर त्यांचा या लीगलाही चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये तरी भारतीय क्रिकेटपटूंनी जगभरातील लीगमध्ये खेळावे. त्यांना बीसीसीआयनेही परवानगी दिली पाहिजे. यासाठी आयसीसीनेही लक्ष घातले पाहिजे, असेही त्याने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.