#CWC19 : ऋषभ पंतने देखील केली सरावाला सुरुवात

मॅंचेस्टर – भारताचा सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाल्यानंतर त्याच्याजागी बदली खेळाडूची निवड करण्यात आलेली नसली तरी विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल झाला. भारत-पाकिस्तान संघांमधील सामन्यापूर्वी भारतीय संघाने कसून सराव केला. या सरावात ऋषभही सहभागी झाला होता. पर्यायी खेळाडू म्हणून पंतला सज्ज ठेवण्यासाठीच बीसीसीआयने हे पाऊल उचलले होते.

दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने शिखर किमान तीन आठवडे खेळू शकणार नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर बदली खेळाडू म्हणून ऋषभला इंग्लंडमध्ये पाठवले जाणार, अशी चर्चा होती. मात्र, शिखरची दुखापत फारशी गंभीर नसल्याने तो काही दिवसांमध्ये फिट होऊ शकतो, असे सांगण्यात आले होते. त्याला कर्णधार विराट कोहलीनेही त्यास दुजोरा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.