इफ्फी 2019 मधील इंडियन पॅनोरमा विभाग आजपासून खुला…

पणजी : 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या इंडियल पॅनोरमाची आज गोव्यातल्या पणजी इथल्या आयनॉक्स चित्रपटगृहात सुरूवात झाली. राष्ट्रीय चित्रपट विजेत्या हेल्लारो या अभिषेक शहा दिग्दर्शित गुजराती चित्रपटाने इंडियन पॅनोरमाच्या फिचर फिल्म विभागात उद्‌घाटन झालं. आशिश पांडे दिग्दर्शित नूरेह या काश्मीरी चित्रपटाने नॉन फिचर चित्रपट विभागाचे उद्‌घाटन झाले.

उत्तम आयुष्याची आशा बाळगणाऱ्या एका छोट्या मुलीची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे असे नुरेहच्या दिग्दर्शकांनी यावेळी सांगितले. आजच्या काळात समर्पक असलेल्या चित्रपटाची आपल्याला निर्मिती करायची होती, असे सांगून इंडियन पॅनोरमासाठी आपल्या चित्रपटाची निवड केल्याबद्दल त्यांनी इफ्फीच्या ज्युरींचे आभार मानले.

इंडियन पॅनोरमात समकालीन भारतीय चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. 26 फिचर आणि 15 नॉन फिचर चित्रपट या विभागाअंतर्गत दाखविण्यात येणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात हिंदी चित्रपटांबरोबर कमी बोलल्या जाणाऱ्या खासी/गारो, पनिया, इरुला आणि पंगचेनपा या भाषांमधले चित्रपटही यावर्षी दाखवले जातील.

फिचर फिल्म विभागात तुझ्या आयला, आनंदी गोपाळ, भोंगा, माई धार आणि फोटो प्रेम हे पाच मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. फिचर फिल्म विभागात मल्याळम् आणि बंगाली प्रत्येकी तीन चित्रपट तर दोन तमिळ आणि एक कन्नड चित्रपट पहायला मिळणार आहे.

फिचर फिल्म विभागात मेनस्ट्रीम सिनेमा हा उपविभाग असून त्यात गलीबॉय, उरी: द सर्जिकल स्ट्राईक, सुपर 30, बधाई हो यासारखे लोकप्रिय चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. F2 हा तेलगु चित्रपटही दाखविण्यात येईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)