पुणे- सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बॅंकेने कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, बॅंकेचा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट म्हणजे “एमसीएलआर’ कमी केला असून या निर्णयाची अंमलबजावणी 10 मे पासून होणार आहे. यासंदर्भात बॅंकेने शेअर बाजाराला सादर केलेल्या माहितीत म्हटले आहे, की 3 महिन्यांसाठीचा एमसीएलआर 8. 10 वरून 8.05 टक्के करण्यात आला आहे.
6 महिन्यासाठीचा एमसीएलआर 8.15 वरून 8.10 टक्के करण्यात आला आहे. बॅंकेने म्हटले आहे की, एक वर्षासाठीचा एमसीएलआर 8.25 टक्क्यांवरून 8.15 टक्के करण्यात आला आहे. बॅंकेचा 2 वर्षांसाठीचा एमसीएलआर 8.30 टक्क्यांवरून 8.20 टक्के करण्यात आला आहे.
बॅंकेचा 3 वर्षासाठीचा एमसीएलआर 8.35वरून 8.25 टक्के करण्यात आला आहे. मात्र बॅंकेने स्पष्ट केले की, ओव्हरनाइट आणि 1 महिन्यासाठीच्या एमसीएलआर दरांमध्ये कसलाही बदल करण्यात आलेला नाही. हा दर 7.80 टक्के या पातळीवर कायम ठेवण्यात आलेला आहे.