ओटावा : अमेरिकेतील ओरेगॉन येथे पर्वतारोहण करताना 11 हजार 400 फुटांवरून पडल्यानंतर भारतीय वंशाचा गिर्यारोहक आश्चर्यकारकरित्या वाचला. खाली कोसळत असताना कोणी तरी थांबवत असल्याचे जाणवले, असे त्याने सांगितले.
कॅनडातील सुररे येथील गुरबेझ सिंग हा पर्वतारोहण करण्यासाठी हूड पर्वतावर आला होता. त्याची 90 वी मोहीम होती. 11 हजार 400 फुट चढल्यावर त्याचा पाय निसटला. आणि खोल दरीत दिसेनासा झला. त्याल शोधण्यासाठी काही तास बचाव पथकाला लागले. अखेर त्याला गिर्यारोहकांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले.
त्याला कोणी तरी थांबवल्याचा भास झाला. खाली कोसळण्यापासून वाचण्यासाठी तो त्याच्या कुऱ्हाडीचा वापर करू पहात होता. मात्र त्याचा खाली येण्याचा वेग इतका होता की तो ते करू शकला नाही,असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याच्यावर पोर्टलॅंड येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र त्याची इजा फारशी गंभीर नाही. आम्ही माझ्याकडे हेल्मेटकडे पाहिले. ते पूर्ण तुटलेले होते. पण मी नशीबवान आहे, असे तो म्हणाला.
त्याच्या पायाचे हाड मोडले आहे. माष तो बरा झाल्यावर मी या पर्वतावर पुन्हा जाणार आहे असे त्याने सांगितले.