नवी दिल्ली – “कोविड-19′ अर्थात “करोना’ व्हायरसच्या प्रभावामुळे जगभरच्या सर्वच क्रीडा स्पर्धांना फटका बसला आहे. त्यामुळे विविध क्रीडा स्पर्धा एकतर रद्द करण्यात आल्या आहेत अथवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
करोनामुळे दिनांक 16 मार्चपासून सुरू होणारी इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धाही 12 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार मार्च 16 ते एप्रिल 12 पर्यंतच्या सर्व आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत स्पर्धांना सध्या सुट्टी देण्यात आली आहे.
त्यामुळे योनेक्स स्वीस ओपन-2020, योनेक्स सनराईज इंडिया ओपन-2020, ऑर्लिन्स मास्टर्स-2020 तसेच मलेशिया ओपन, सिंगापूर ओपन यासह अन्य 36 स्पर्धांना फटका बसला आहे.