कोची – नौदलाने आपल्या नाविक तळाच्या किंवा आपल्या मालमत्तांच्या तीन किमी परिसरात ड्रोन उडवण्यास किंवा विमानचालक रहित विमाने उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
संरक्षण दलाच्या निवेदनात नमूद केले आहे की, अशा प्रकारचे कोणतेही ड्रोन किंवा युएव्ही या परिासरात उडवले गेल्यासस ते नष्ट केले जाईल किंवा जप्त केले जाईल तसेच संबंधीतांवर आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले जातील असे संरक्षण दलांनी स्पष्ट केले आहे.
मागच्या महिन्यात जम्मूच्या हवाईदलाच्या तळावर ड्रोन हल्ल्याचा प्रकार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रोन मुळे संरक्षण दलांसाठी नवीन आव्हानात्मक वातावरण तयार झाल्याने ते रोखण्यासाठी सध्या विविध प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत.