भारतीय नौदलाचे प्रशिक्षक मिग-२९के विमान दुर्घटनाग्रस्त

नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे प्रशिक्षक मिग-२९के विमान दुर्घटनाग्रस्त झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. नौदलाचे मिग-२९के विमान अरबी समुद्रात कोसळले आहे. अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले.


शोध मोहिमेदरम्यान बचाव पथकाकडून एका पायलटला वाचविण्यात आले, तर दुसर्‍या पायलटचा शोध सुरू आहे. नौदलाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मिग -29 विमान हे रशियन लढाऊ विमान आहेत. सायंकाळी पाच वाजता अरबी समुद्रात हा अपघात घडल्याचे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले. बेपत्ता झालेल्या पायलटचा शोध घेण्यासाठी नौदलाने पाळत ठेवणारी विमान आणि बोटी तैनात केली आहेत. घटनेची चौकशी करण्याचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मिग-२९ विमान याआधीही अनेकदा दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. ८ मे २०२० रोजी पंजाबमधील नवाशहर येथे नौदलाचं लढाऊ विमान मिग-२९ तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटनाग्रस्त झाले होते. यावेळी वैमानिकाने पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारुन आपला जीव वाचवला होता. विमान एका शेतात दुर्घटनाग्रस्त झालं होतं, ज्यामुळे शेताला आग लागली होती.

तर २३ फेब्रुवारी २०२० रोजी गोव्यात मिग-२९ दुर्घटनाग्रस्त झाले होते. वैमानिक या दुर्घटनेतून सुखरुपपणे बाहेर पडला होता. सकाळी १० वाजता विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. मात्र काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला ज्याची माहिती एअर ट्राफिक कंट्रोलला देण्यात आली. याचदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झालं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.