भारतीय वायूदलाचं AN-32 विमान उड्डाणानंतर बेपत्ता

आसाम – भारतीय वायूदलाचं AN-32 हे विमान उड्डाणानंतर अचानक बेपत्ता झालं आहे. आसामधील जोरहाट इथून या विमानानं दुपारी 12 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास उड्डाण केलं होत. मात्र, उड्डाणानंतर काही तासातच AN-32 या विमानाचा जमिनीशी संपर्क तुटला आणि त्यानंतर हे विमान बेपत्ता झालं आहे. विमानानं दुपारी 1 च्या सुमारास जमिनीवरच्या कक्षाशी शेवटचा संपर्क साधला होता. मेंचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर हे विमान उतरणार होत.

दरम्यान, AN-32 या विमानात 8 क्रू मेंबर आणि इतर 5 असे एकूण 13 प्रवासी आहेत. ‘Sukhoi-30 आणि C-130’ ही वायुदलाची दोन खास लढाऊ विमानं बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.