बर्मिंगहॅम – गतविजेत्या भारताने रविवारी येथे झालेल्या तिसऱ्या लढतीत बांगलादेशचा 3-0 असा धुव्वा उडवून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुष टेबल टेनिस सांघिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अचंता शरथ कमलच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाने बार्बाडोस, सिंगापूर आणि उत्तर आयर्लंडला समान 3-0 अशा फरकाने पराभूत केले होते.
हरमीत देसाई आणि साथियान ज्ञानसेकरन या जोडीने बांगलादेशच्या रामहिमिलियन बावम आणि मोहतासिन अहमद रिडॉय यांचा 11-8, 11-6, 11-2 असा सरळ तीन गेममध्ये पराभव करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
#TableTennis Update 🚨
Indian Men’s Team defeat Team Bangladesh in dominant fashion 3-0 to enter the SEMIFINALS 🔥🔥
Will next play Nigeria in the SF
Let’s continue to #Cheer4India #India4CWG2022 pic.twitter.com/m1ICHZl4kB
— SAI Media (@Media_SAI) July 31, 2022
त्यानंतर अनुभवी शरथ कमलने पुरुष एकेरीत मो. रिफत सिब्बरचा 11-4, 11-7, 11-2 असा पराभव करून भारताची आघाडी वाढवली. अन्य एकेरी लढतीत ज्ञानसेकरनने शेवटपर्यंत वर्चस्व राखत 11-2, 11-3, 11-5 असा सहज विजय मिळवित विजयावर शिक्कामोर्तब केला.