BIGGEST NEWS : पुरुष हॉकीत भारताची गतविजेत्या अर्जेंटिनावर 3-1 ने जोरदार मात

BIGGEST NEWS :

टोक्‍यो – येथे सुरु असलेल्या ऑलिंपिक्‍स स्पर्धेत पुरुष हॉकीच्या साखळी सामन्यात भारताने आज सकाळी बलाढ्य आणि पदकाचा दावेदार मान्या जात असलेल्या अर्जेंटीनावर 3-1 अशी मात करत हॉकीमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

गेममध्ये दोन मिनिटे शिल्लक असतानाच भारताने आक्रमण सुरुच ठेवले आणि जवळपास अखेरच्या मिनिटाच्या सुरुवातीस आणखी एक गोल करुन सामन्यात आपली विजयी आघाडी 3-1 अशी नोंदवली.

त्याआधी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर विवेक सागर प्रसादने भारताची आघाडी वाढवताना 2-1 अशी कामगिरी केली. विवेक सागर प्रसादसाठी हा ऑलिम्पिकमधील पहिला गोल ठरला.

त्याआधी भारत 1-0 अशा आघाडीवर असताना अर्जेंटिनाचा गोलकीपर डाव्या हाताने गोल करीत असलेल्या रुपिंदरचा शॉट वाचवण्यासाठी त्याने आक्रमक कामगिरी करत आहे. भारतीय गोलरक्षक श्रीजेशला समजायच्या आतच अर्जेंटिनाच्या मायको केसलाने गोल नोंदवत सामन्यात बरोबरी साधली.

अगदी सुरुवातीला व्हिडिओ रेफरल मिळाल्यानंतर मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरनंतर तिसऱ्या हाफमध्ये भारताने महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. वरुण कुमारने सुपर ड्रॅग फ्लिकसह गोल करून भारताला गत ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाविरुद्ध 1-0 ने आघाडीवर नेले.
सामना इतका चुरशीचा झाला की पहिला दोन्ही हाफमध्ये गोलशून्य बरोबरी राहिली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.