कोल्हापूर – वैद्यकीय व्यवसायामध्ये सामाजिक व श्रेणीय पैलू निर्माण करण्याचा एकत्रित प्रयत्न म्हणून, इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए) या मेडिसिनच्या आधुनिक शास्त्रीय व्यवस्थेतील डॉक्टरांच्या राष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेने आज सत्यशोधक मोहीम समितीची स्थापना केली आहे. ही समिती, मुंबईतील बीवायएल नायर रुग्णालयातील तरुण निवासी डॉक्टरी पायला ताडवी यांच्या दुर्दैवी आत्महत्येची पार्श्वभूमी व महत्त्वाचे घटक यांचे मूल्यमापन करणार आहे.
निवासी डॉक्टरांवर व प्रामुख्याने सरकारी रुग्णायांतील निवासी डॉक्टरांवर कामाचा कमालीचा ताण असतो आणि त्यामुळे त्यांना नैराश्य येते, ही बाब सर्वांना माहीत आहे. संबंधित प्रकरणात, जातीय भेदभाव व कलंक हे आरोप करण्यात आले आहेत. जर हे खरे असेल तर हा फार गंभीर विषय आहे व त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. वैद्यकीय व्यवसायाने जात, धर्म व राजकारण या अडळ्यांवर केव्हाच मात केली आहे. वैद्यकीय समुदायात किंवा रुग्णांमध्ये कोणत्याही बाबतीत भेदभाव केला जात नाही. परंतु, या अलिखित नियमामध्ये, वैयक्तिक हेवेदावे व वर्तन निर्माण होऊ शकते.आयएमए भेदभाव करणाऱ्या कोणत्याही वर्तनाकडे कानाडोळा करत नाही.
डॉक्टरांना ज्या हालाखीच्या स्थिती काम करावे लागते ती स्थिती व विशेषतः सरकारी रुग्णालयांतील राहण्याची व्यवस्था, त्यांच्याकडून नेहमीच लादला जाणारा कामाचा असाधारण ताण आणि क्लिनिकल कौशल्यांच्या अभावाबद्दल नेहमी केला जाणारा उपहास, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आयएमए सत्यशोधक समिती हा क्लिष्ट विषय बारकाईने अभ्यासणार आहे आणि एका आठवड्यामध्ये समितीने आयएमए राष्ट्रीय अध्यक्षांकडे अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.