नवी दिल्ली – जगभरात मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसमवेत सरत्या वर्षाला नागरिकांनी निरोप दिला. तसेच नवीन वर्षाचे भारतीय जवानांनीही मोठ्या जल्लोषात स्वागत केले. नेहमी कर्तव्यावर असताना देशाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांनी नृत्याचा आनंद लुटला.
नववर्षाचं स्वागत करताना उत्तराखंडमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी गाण्यावर ठेका धरला. छत्तीसगढमधील रायपुर येथे सीआरपीएफच्या जवानांनी काही अशा प्रकारे नववर्षाचं स्वागत केलं. याप्रसंगीचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.