भारतीय गुंतवणूकदारांना आयटी देणार साथ! (भाग-१)

मागील आठवड्यात एकाच दिवशी म्हणजेच शुक्रवारी १२ एप्रिल रोजी, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्यांनी आपले चौथ्या तिमाहीचे निकाल नोंदवले. देशातील सर्वात दुसरी मोठी माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवठादार इन्फोसिसने चौथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जोरकस असा ४०७४ कोटी रुपये नफा कमावून चांगली कामगिरी दर्शविली.

गेल्या तिमाहीपेक्षा ही वाढ ही १३ टक्क्यांहून अधिक आहे. तर मागील तिमाहीमध्ये ऑपरेटिंग नफ्याचं मार्जिन हे २२.५७ टक्क्यांवरून किंचित घसरून २१.४ टक्क्यांवर आलं आहे. या तिमाहीत डॉलर मधील महसूल हा २.४४ टक्क्यांनी वाढून ३०६० डॉलरवर गेलेला आहे जरी मागील तिमाहीमध्ये प्रति रुपया डॉलरचा भाव हा त्याच पातळीवर म्हणजे साधारणपणे ६९ रुपयांच्या जवळपास ताटकळत राहिलेला आढळतो, कदाचित त्यामागील कारण हे कंपनीनं त्यासाठी केलेल्या व्यूहात्मक योजना (HEDGE) असू शकतात. म्हणजेच जर कंपनीचं उत्पन्न हे कंपनीस भारतीय रुपयांमध्ये मिळणार असेल व रुपयाच्या बाबतीत तज्ज्ञांचा अंदाज हा डॉलरचं अवमूल्यन दर्शवत असेल तर मुद्रा किंवा चलन विनिमय बाजारात कंपनी त्याउलट पोझिशन घेऊन होणारं नुकसान रोखू शकते. उदा. जर कंपनीचं उत्पन्न हे पुढील वर्षी अमूक एका दिवशी म्हणजेच वर्षाशेवटी हे रुपयांत मिळणारं असेल व असा व्यवहार झाल्याच्या दिवशी एका डॉलरचा भाव हा ७१ रुपये असेल परंतु कंपनीतील असे व्यवहार पाहणाऱ्या तज्ञास डॉलरचा भाव त्या ठराविक दिवशी ६५ रुपये प्रति डॉलर येईल असं वाटत असल्यास तेवढ्या रकमेचे फ्युचर्स विकून ३ रुपये होणारं नुकसान (७१ वजा ६८) भरून काढता येऊ शकतं. जास्त अधीरता न दर्शवता, इन्फोसिसनं स्थिर चलन महसूल वाढीच्या मार्गदर्शनाची अपेक्षा वित्तीय वर्ष २०१९-२० साठी साडेसात ते साडेनऊ टक्के अशी केली जी विश्लेषकांच्या अंदाजानुसार ८ ते १० टक्क्यांनी कमी आहे.

दुसरे निकाल म्हणजे या क्षेत्रातील अव्वल अशा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस या कंपनीचे. कंपनीनं अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी करून ३८०१० कोटी रुपयांच्या उत्पन्नाची नोंदणी केलीय ज्यातील ३१ टक्के उत्पन्न हे डिजिटल सेवांमधून आलेलं आहे. कंपनीचा नफा (YoY) १८ टक्क्यांनी वाढून ८१२६ कोटी रुपयांवर पोहोचलाय, तर संपूर्ण २०१८-१९ आर्थिक वर्षाचा नक्त नफा हा २१.९ टक्क्यांनी वाढून ३१४७२ कोटी रुपये झालेला आढळतो तर एकूण वर्षातील उत्पन्न १,४६,४६३ कोटींवर पोहोचलंय. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर), राजेश गोपीनाथन यांच्या म्हणण्यानुसार गेल्या पंधरा तिमाहींतील कंपनीच्या उत्पन्नामधील ही सर्वांत मोठी कामगिरी आहे तर कंपनीची ऑर्डर बुक ही मागील तीन तिमाहीत सर्वांत जास्त असून व होऊ घातलेले व्यवहार देखील लक्षणीय आहेत. दोन्ही कंपन्यांनी अनुक्रमे, प्रति शेअर १०.५ रु. म्हणजे २१०% व प्रति शेअर १८ रु. म्हणजे १८०० टक्के लाभांशाची घोषणा केलीय. त्यामुळं इन्फोसिसच्या एका शेअरमागील लाभांश उत्पन्न १.४ % तर टीसीएसचं प्रतिशेअर लाभांश उत्पन्न हे ०.८९% ठरतंय (शुक्रवारच्या बंद भावाप्रमाणं).

तर अशा या वाढ दर्शवणाऱ्या प्रमुख क्षेत्रातील कांही प्रमुख मुद्द्यांवर लक्ष देऊ,

वाढती मागणी – नवीन स्टार्टअप्स, स्थानिक मागणी, सेवा निर्यात मागणी.

जागतिक ठसा – भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची जगभरात वितरण केंद्रं आहेत आणि त्यांच्या सेवा या बँकिंग, वित्तीय सेवा पुरवठादार कंपन्या (BFSi),  दूरसंचार आणि रिटेल सारख्या विविध वर्गामध्ये विविधीकृत आहेत.

स्पर्धात्मक फायदे – माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा (ITeS) पुरवणाऱ्या कंपन्यांना सेवा देण्यासाठी येणारा तुलनेनं कमी खर्च, याचं सर्वांत महत्वाचं कारण म्हणजे स्वस्तात उपलब्ध असलेलं व्यापक कुशल मनुष्यबळ जे अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या तुलनेत ५ ते ६ पटीनं कमी आहे.

धोरणात्मक टेकू – स्टार्ट-अप इंडिया योजने अंतर्गत असलेली करातील सूट.

भारतीय गुंतवणूकदारांना आयटी देणार साथ! (भाग-२)

विविधता – विशेष म्हणजे भारतातील इन्फोसिस, विप्रो, टीसीएस, टेक महिंद्रा अशा आघाडीच्या कंपन्या आपल्या सेवेत ब्लॉकचेन, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) इ. गोष्टींद्वारे विविधता (diversification) जोपासत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.