भारतीय हॉकी संघाचा पोलंडवर १०-० ने विजय

इपोह (मलेशिया) – सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारताने यजमान मलेशियावर मात केल्यानंतर भारताने बुधवारी झालेल्या सामन्यात कॅनडाचा 7-3 अशा गोल फरकाने धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारताचा अंतिम फेरीत आधीच समावेश झाला होता. त्यानंतर आज झालेल्या पोलंडच्या सामन्यात भारतीय संघाने अपेक्षित असा खेळ करत पोलंडचा १०-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानी असलेल्या भारतीय हॉकी संघासाठी, २१ व्या क्रमांकावर असलेल्या पोलंडला नमवणे अगदीच सोपे होते. त्यामुळे भारतीय संघाने साजेशीच खेळी करत पोलंडला खातेही खोलू न देता १०-० अशा मोठ्या फरकाने मात दिली आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना पुन्हा बलाढ्य दक्षिण कोरिया सोबत रंगणार आहे. यापूर्वी दक्षिण कोरियाशी झालेल्या साखळी सामना फेरीत भारतीय संघाला १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आता अंतिम फेरीसाठी भारतीय हॉकी संघाला जोरदार तयारी करावी लागणार.

Leave A Reply

Your email address will not be published.