दुबई – दुबईमध्ये वास्तव्यात असलेल्या एका भारतीय मुलीने अतिशय कमी आणि मर्यादित
जागेत आणि काही मिनिटातच तब्बल शंभर योगासने करून एका आगळ्यावेगळ्या विश्वविक्रमाची
नोंद केली आहे.
या अकरा वर्षे मुलीचे नाव समृद्धी कालिया असे असून सर्वात कमी जागेत आणि सर्वात कमी
वेळात जास्तीत जास्त योगासने केल्याबद्दल तिचे नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
नोंदवण्यात आले आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचा विक्रम तिने तब्बल तिसऱ्यांदा केला आहे वयाच्या सहाव्या वर्षापासून योगासने करणाऱ्या समृद्धीने गेल्या महिनाभराच्या कालावधीत दोनदा अशाप्रकारचा विक्रम पूर्ण केला आहे दुबईतील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफा या इमारतीवर समृद्धीने योगासनांचे प्रदर्शन करून या विक्रमाची नोंद केली.
या पूर्वी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने तिने एका मिनिटात 40 अवघड आसने पूर्ण करून विश्वविक्रम केला होता.