…तर काश्मीरमध्ये भारतीय झेंडा फडकणार नाही : फारुख अब्दुल्ला 

श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष तथा आगामी लोकसभा निवडणुकांमधील श्रीनगरचे लोकसभा उमेदवार फारुख अब्दुल्ला यांनी आज श्रीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये बोलताना भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील कलम ३७० हटवण्याबाबतच्या आश्वासनावर जाहीर टीका केली. ते म्हणाले, “ते आपल्या निवडणूक जाहीरनाम्याद्वारे कलम ३७० हटवण्याचे आश्वासन देत आहेत. जर असं झालं तर जम्मू आणि काश्मीर भारताचा भाग राहणार नाही.”

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, “त्यांनी हे पाऊल उचलून दाखवावं मग आपण पाहुयात जम्मू काश्मीरमध्ये भारताचा झेंडा कोण फडकावतंय… आमचं हृदय तोडणाऱ्या गोष्टी करू नका तर हृदय जोडणाऱ्या गोष्टी करा.”

“जम्मू आणि काश्मीर हे मुस्लिम बहुल राज्य असून हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही मोदी जम्मू काश्मिरात प्रचारासाठी येतात. त्यांनी आपल्या प्रचारसभांमधून तरी काश्मिरी लोकांबाबत दोन चांगले शब्द बोलावेत.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.